पुणे शहर
पुण्यात खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स कोविडसाठी राखीव !

पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व खासगी दवाखान्यातील ८० टक्के बेड्स कोविड उपचारासाठी उपलब्ध करुन देण्याबाबतचे आदेश आज काढण्यात आले आहेत. ३१ मार्चपासून हे बेड्स कोविड रुग्णांना उपलब्ध होतील. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.80% beds in private hospitals reserved for Kovid!

पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील खासगी रुग्णालयातील ८०% बेड्स हे कोविड च्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत हे बेड्स उपलब्ध होणार आहेत.
https://twitter.com/mohol_murlidhar/status/1376521195533660164?s=19



