पुणे शहर

जागतिक पर्यावरण दिना दिवशीच पुण्यात झाडांची मोठी कत्तल

पुणे : ५ जून रोजी”जागतिक पर्यावरण दिन” सर्वत्र साजरा केला जातो. त्यामध्येच पुणे महानगरपालिका उद्यान विभाग व महाराष्ट्र शासनाचे वनविभाग मोठा गाजावाजा करून या दिवसाचं औचित्य साधून फोटो काढण्यात मग्न असतात. पण याच दिवशी पुण्यात मोठी वृक्ष तोड झाल्याचे पुढे आले आहे.

पर्यावरण दिना दिवशीच वन विभागाच्या हद्दीतील 30 ते 40 वर्ष जुने वृक्षावर कुऱ्हाड चालवण्याचं काम केलं असल्याचा आरोप वृक्ष प्रेमी समीर निकम यांनी केला आहे. निकम यांनी सांगितले की, गोखले नगर ,मेंढी फार्म जवळील सर्वे नंबर 98/99 च्या शेजारी वन विभागाच्या रस्त्यालगत मोठी वृक्ष तोड करण्यात आली आहे. वास्तविक या झाडाची अडचण एका बड्या बांधकाम व्यवसायिकाला होत आहे. म्हणून सदर झाड छाटण्यात आल्याचे पाहता क्षणी लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Img 20240607 wa00106155524562941881055

या संदर्भात समीर निकम व सुधीर धोत्रे यांच्याकडून  उपवन संरक्षक अधिकाऱ्यांना तक्रार देण्यात आली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Img 20240606 wa00116415178194496147748

वन क्षेत्रात अथवा वन विभागाच्या जागेवरील एखादं झाड सुद्धा कापण कायदेशीर गुन्हा ठरतो. वन विभागाच्या जमिनीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांना वन विभागाचा कायदा कठोर पाळावा लागतो परंतु पुणे शहरातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्या देखत त्यांच्याच हद्दीतील वृक्षतोड व ओढ्याची दिशा बदलण्याचा प्रकार एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाकडून होत असताना सुद्धा याच्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

शहरातील बांधकाम व्यावसायिक पैशाच्या जोरावर काय करू शकतात याची प्रचिती शहरातील एका घटनेने नुकतीच आली असताना, आज “जागतिक पर्यावरण” दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बांधकाम व्यवसायिकासाठी नियम कसे शिथिल होतात हे पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे. 

Fb img 17177364062809189252169858838863
Fb img 17176807055063452256632276440792
Img 20240606 wa00121276257491443928373
Img 20240607 wa00128459478484949832471
Img 20240607 wa00153684919149705913893
Img 20240404 wa00162092919036315770776
Img 20240404 wa00132425955639205292116

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये