पुणे शहर
चौथ्या मजल्यावरील खिडकीतून पडणाऱ्या मुलीचे अग्नीशमन दलाने वाचवले प्राण ; पुण्यातील घटना पाहा व्हिडिओ…

पुणे : पुण्यातील शुक्रवार पेठेमधील गणेश अपार्टमेंट येथे चौथ्या मजल्यावरील खिडकीच्या ग्रीलमधून खाली पडत अडकलेल्या एका मुलीची सुटका अग्निशमन दलाच्या जवानांनी केली. जाळी, शिडी व रश्शीच्या साह्याने सुखरुप सुटका करत त्या मुलीला जीवदान देत अग्निशमन दलाने चोख कामगिरी बजावली. (Firefighters rescued a girl who fell from a window on the fourth floor; Incidents in Pune)
या कामगिरीमधे अग्निशमन अधिकारी सचिन मांडवकर, तांडेल कैलास पायगुडे, वाहनचालक राजू शेलार जवान राहूल नलावडे, अतुल खोपडे, मारुती देवकूळे, किशोर बने, संजय पाटील, अक्षय गांगड, विठ्ठल शिंदे सहभाग घेतला.@Pmcpune , #punefire




