अर्थजगत

पेट्रोलचे दर लिटरमागे 3 रुपये 20 पैशांनी वाढले

मुंबई : मागील पाच दिवसांमध्ये पेट्रोलचे दर लिटरमागे 3 रुपये 20 पैशांनी वाढले आहेत. आजही पेट्रोल 82 तर डिझेल 81 पैशांनी महागले आहे. मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 113.29 पैसे आणि एक लिटर डिझेलची किंमत 97.49 पैसे झाली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंधन दरवाढीचं समर्थन करताना भारताने इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केले आहे. कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्या सध्या फ्लक्स फ्युएलवर काम करणाऱ्या इंजिनसच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत असून काही महिन्यांमध्ये हे तंत्रज्ञान विकसित होईल असं गडकरी म्हणाले आहेत.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये