पुणे शहर

विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण व्हावा-आमदार शिरोळे यांची मागणी

पुणे – वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण व्हावे, अशी जोरदार मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुम्टा) च्या बैठकीत आज (बुधवारी) केली.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीला आमदार शिरोळे यांच्यासह पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमआरडीए चे आयुक्त राहुल महिपाल, वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त विजय मगर, तसेच पीएमआरडीए चे अधिकारी, पुणे महापालिकेचे अधिकारी व टाटा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस चालना देणे, वाहतूक विषयक विविध समस्या सोडविणे याकरिता बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीमध्ये चर्चा झाली. पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करावा अशी जोरदार मागणी आमदार शिरोळे यांनी केली. तसेच हा उड्डाणपूल करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो का? याचा सर्व्हे टाटा कंपनी करणार असून त्या सर्व्हेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास आणि उड्डाणपूल उभारणीचा कालावधी कमी होत असेल तर याबाबत राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे बैठकीत ठरविण्यात आले.

Img 20221228 wa0001281294015812215888080109

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये