पुणे शहर
टाइम्स रियाल्टी आयकॉन २०२१ पुरस्कार बढेकर ग्रुपला प्रदान..

पुणे : टाइम्स ग्रुपच्या वतीने देण्यात येणारा बेस्ट डेव्हलपर – रिडेव्हलपमेंट पुणे २०२१ या विभागातला टाइम्स रियाल्टी आयकॉन २०२१ हा पुरस्कार बढेकर ग्रुपला देण्यात आला आहे. बढेकर ग्रुपचे प्रविण बढेकर यांनी अभिनेता कुणाल कपूर यांच्या हस्ते एका समारंभात हा पुरस्कार स्वीकारला.
या पुरस्काराबाबत बढेकर ग्रुपचा विचार केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझ्या व्यावसायिक कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा क्षण आहे. माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी हि खरोखर अभिमानाची बाब आहे. माझ्या टीमच्या मदतीशिवाय हे आमच्यासाठी कधीही शक्य झाले नसते. सर्व बढेकर ग्रुपचे ग्राहक ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यांचे मन: पूर्वक आभार अशा भावना पुरस्कार मिळाल्यानंतर प्रविण बढेकर यांनी व्यक्त केल्या आहेत.







