कोथरूडमधील भुजबळ टाऊनशिपच्या अकराव्या मजल्यावर आगीची मोठी घटना; चार फ्लॅट आगीत भस्मसात

पुणे : कोथरूड मधील एकलव्य कॉलेज जवळील भुजबळ टाऊनशिप इमारतीमधील अकराव्या मजल्यावरील चार फ्लॅटमध्ये मोठी आग लागण्याची दुर्घटना आज दुपारी अडीच वाजता घडली. अग्नीशमन दलाच्या सहा बंब घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आली आहे.सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
आज (शुक्रवारी) दुपारी अडीच वाजता कोथरूड मधील एकलव्य कॉलेज जवळील भुजबळ टाऊनशिप इमारतीमधील अकराव्या मजल्यावर राहत असलेल्या भुजबळ यांच्या घरामध्ये अचानक पणे आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने कुटुंबातील सर्व व्यक्ती वेळीच सावध होऊन घरातून सुखरूप बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेत भुजबळ यांच्या चार फ्लॅटचे मोठे नुकसान झाले आहे. हि आग नेमकी कशामुळे लागली याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक राजाभाऊ गोरडे म्हणाले, भुजबळ टाऊनशिप येथे मोठी आग लागली होती. यावेळी सर्व प्रथम सोसायटी मधील सर्व नागरिकांना सुरक्षित पने बाहेर काढण्यात आले. अग्नीशमन दलाच्या सहा गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करत हि आग आटोक्यात आणली आहे.













