पुणे शहर

आदित्य ठाकरे यांनी पुणे महापालिकेत येऊन आयुक्त विक्रम कुमार यांचे केले अभिनंदन..

पुणे महापालिकेला पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सी-४० पुरस्कार..

पुणे : शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री असताना पर्यावरणाशी निगडीत कामांना चालना व गती दिली होती. पुणे महानगरपालिकेला पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सी-४० पुरस्कार मिळाल्याने आज आदित्य ठाकरे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

पर्यावरणाशी निगडीत कामांना चालना व गती आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना दिलेली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे पुणे शहराला मिळालेल्या या पुरस्कारासाठी खास अभिनंदन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेत आले होते.

Img 20221028 wa0225

यावेळी ठाकरे यांनी पुणे शहरातील पर्यावरण, ई-बस, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, पावसाळी पाण्याचे नियोजन, ई-बाईक, रस्ते, फूटपाथ, सायकल ट्रॅक या प्रश्नांबाबत चर्चा केली व पुणे शहराच्या विकासासाठी काही उपयुक्त अशा सूचना केल्या. या सूचनांना आयुक्त विक्रम कुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Img 20220910 wa00253950213425057106133

या यावेळी शिवसेनेचे पुणे शहर व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज शशिकांत सुतार, शहरप्रमुख गजानन थरकुडे, शहरप्रमुख  संजय मोरे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, पुणे उपशहर प्रमुख आनंद रामनिवास गोयल, युवासेना कार्यकारणी सदस्य साईनाथ दुर्गे, आदी उपस्थित होते.

Img 20221012 192956 045
Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये