पुणे शहर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)कोथरूड मतदार संघाच्या अध्यक्षपदी स्वप्नील दुधाने

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी स्वप्निल दुधाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज स्वप्नील दुधाने यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,मध्यवर्ती कार्यालय, पुणे येथे खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पक्षाचे जेष्ठ नेते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. दुधाने यांनी याआधी ही कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष व पुणे शहराचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार बंड करत सहकारी अमदारांसमवेत शिंदे फडणवीस सरकार मध्ये सहभागी झाले आणि पक्षात फूट पडली. या फुटी नंतर नेते, पदाधिकारी अजित पवार व शरद पवार अशा दोन गटात विभागले जाऊ लागले. काहींनी अजित पवारांना पाठिंबा दिला तर काहींनी शरद पवारांना

हा प्रकार घडल्यानंतर स्वप्नील दुधाने यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे जाहीर केले होते. साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे आपला असे फ्लेक्स प्रभागात लावून त्यांनी आपले समर्थन साहेबांना आहे हे दाखवून दिले होते. याच वेळी त्यांनी भावनिक पोस्ट करत आपण साहेबांच्या पाठीशी का आहे सांगितले होते.

स्वप्नील दुधाने यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर केलेली पोस्ट

साहेब सोबतीला…

वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी राजकारणात पाय ठेवणारे पवार साहेब यांनी आपले पाय असे काही रोवले की, वयाच्या नव्वदीतही एखाद्या वटवृक्षाप्रमाणे देशाच्या राजकारणात हा सह्याद्री अढळपणे उभा आहे.

या अर्ध्या शतकात कित्येक चढ उतार पाहणारा हा सह्याद्री कित्येक वादळांना आपल्या छातीवर झेलत आला आहे. या काळात या सह्याद्रीने अनेक कार्यकर्त्यांना नेतेपदी, मंत्रीपदी पोहोचवले. आज मात्र परिस्थिती गंभीर असताना फिरलेल्या वाऱ्यासोबत पाठ फिरवत साहेबांना पाठ दाखवण्याची इच्छा मुळीच होत नाही.

या वटवृक्षाच्या छायेखाली वाढणाऱ्या साऱ्याच रोपट्यांना स्वतः वटवृक्ष व्हावेसे वाटणे यात गैर काहीच नाही, पण वादळात याच वटवृक्षाचा आडोसा घ्यावेसे वाटते, यातच काय तो त्याचा मोठेपणा! म्हणूनच तूर्तास तरी वटवृक्ष होण्याची हाव करण्यापेक्षा वटवृक्षाच्या छायेखाली राहणे हेच अधिक योग्य वाटते.

– श्री. स्वप्नील दुधाने.

Img 20230511 wa0002281296351682306326034196
Img 20221228 wa00016208176808646242256
Img 20230708 wa0003
Img 20230707 wa00028448431949763512232

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये