पुणे शहर

कोथरूडमध्ये ‘आई’ महोत्सवाचे आयोजन..

महोत्सवाच्या बोध चिन्हाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण

पुणे : वृंदावन फाऊंडेशन व स्त्री शक्ती संस्था पुणे यांच्या वतीने मातृप्रेमाच महामंगल स्त्रोत समजल्या जाणाऱ्या ‘ आई ‘ या विषयावर आधारीत पहिला “आई महोत्सव ” आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या आई महोत्सवाच्या भाजपा पुणे महिला मोर्चा सरचिटणीस गायत्री भागवत या
स्वागताध्यक्षा असणार आहेत. एरंडवणे पुणे येथील गणेश हॉल मध्ये 17 व 18 डिसेंबर रोजी हा महोत्सव पार पडणार आहे.

Fb img 1647413711531 1

या महोत्सवात ‘आई’ या विषयावर आधारित विविध कार्य परीघातील मान्यवर मंडळींची व्याख्याने, परीसंवाद, कवी संमेलन, प्रकट मुलाखत व सांस्कृतिक कलाविष्कार सादर केले जाणार आहेत. याप्रसंगी भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस स्वागताध्यक्ष गायत्री भागवत प्रसाद राहुरकर, कवी फुलचंद नागटिळक, शुभम राहुरकर, प्रतिक यादव, शुभम देडगावकर, नितीन खत्री आदी उपस्थित होते.

Img 20221012 192956 045 1

राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई, महामाता रमाई इ मातांचा आदर्श समाज मनाला नेहमीच प्रेरणा देणारा राहीला आहे संपूर्ण जगाच्या कुतूहलाचा विषय असलेली भारतीय कुटुंब संस्था ही आईनीच घराघरातील सांभाळलेली आहे . त्यांच्याच कार्यकर्तुत्व अन त्यागमय जीवनाचे दर्शन घडविणारा ‘ आई महोत्सव’ तरुणाई करीता प्रेरणादायी राहणार आहे, ‘आई महोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक साहित्यिक वर्तुळात भर घालेल अशा भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.

Img 20221110 wa0001303173172162697740

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये