पुणे शहर

पुणेकरांनी रक्तदानासाठी दाखवलेली एकजूट समाधान देणारी होती : महापौर मुरलीधर मोहोळ ; ३ हजार ८६० जणांनी केले रक्तदान..

३ हजार ८६० जणांनी केले रक्तदान..

पुणे : pune city पुणे शहरातील रक्त पिशव्यांचा तुटवडा लक्षात घेऊन वाढदिवसदिनी महापौर मुरलीधर मोहोळ Mayor Muralidhar Mohol यांनी रक्तदान महासंकल्प दिवस आयोजित केला होता. पुणेकरांना रक्तदान करुन शुभेच्छा देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदानासाठी पुणेकर एकवटल्याचे चित्र दिसले. वाढदिवसदिनी दिवसभरात तब्बल ३ हजार ८६० रक्तदात्यांनी रक्तदानरुपी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे शहरातील रक्ताची तूट एकाच दिवसात भरून निघाली आहे.

संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे या रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पुणेकरांना उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या शिबिरात विविध १९ रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी या शिबिराला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, आमदार  भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे, आरपीआय शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आयुक्त विक्रम कुमार, डॅा.चारूदत्त आपटे यांच्यासह नगरसेवक, भाजप पक्षपदाधिकारी, कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

Img 20211028 wa0192 1

महापौर मुरलीधर म्हणाले, पुणेकर एकत्र आले तर काय करु शकतात? हे कोरोना संकटाचा सामना करताना दिसून आले होते. सद्यस्थितीत शहरात रक्ताचा तुटवडा असताना पुणेकरांनी रक्तदानासाठी दाखवलेली एकजूट समाधान देणारी होती. ३ हजार ८०० पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदानरुपी दिलेल्या शुभेच्छा नजीकच्या गरजूंना जीवनदान देणाऱ्या ठरणाऱ्या आहेत. रक्तदान करणाऱ्या सर्व पुणेकरांचा मी ऋणी आहे. अनेकांना इच्छा असूनही वैद्यकीय कारणांनी रक्तदान करता आले नाही. त्यांनी प्रत्यक्ष उपक्रमाला भेट देऊन दिलेल्या शुभेच्छाही महत्त्वाच्या होत्या.

‘पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच सेवा उपक्रमावर भर देण्याचा आग्रह धरतात. त्यालाच अनुसरून मुरलीधर यांनी वाढदिवसाला पुष्पगुच्छ नको रक्तदान करा, असे आवाहन केले. त्या आवाहनाला पुणेकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आण्णांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल, त्यांचे भाजपा परिवाराच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन.‌ भविष्यातदेखील त्यांनी असेच लोकोपयोगी उपक्रम राबवावेत, यासाठी शुभेच्छा, अशी भावना यावेळी
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

Img 20211105 wa0169

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये