नूतन वर्षा निमित्त भाजपचा कोथरूडमध्ये स्नेहमेळावा

कोथरूड : (Kothrud) भारतीय जनता पार्टी, पुणे शहर महिला सरचिटणीस कांचन कुंबरे यांच्या व कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या वतीने नूतन वर्षा निमित्त स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.
या स्नेहमेळाव्या प्रसंगी भाजपाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, खडकवासला आमदार भीमराव अण्णा तापकीर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस दीपक पोटे, महिला अध्यक्षा अर्चना पाटील, नगरसेवक सुशील मेंगडे , जयंत भावे , दिलीप वेडेपाटील , किरण दगडे , अल्पना वर्पे , श्रद्धा प्रभुणे , हर्षाली माथवड, वासंती जाधव, छाया मारणे , मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्त्रबुद्धे, मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, महिला अध्यक्षा हर्षदा फरांदे, माजी नगरसेवक उज्वल केसकर आणि सर्वे पदाधिकारी आणि कार्यकर्ते याच्या उपस्थिती मध्ये उत्साहात पार पडला. नवीन वर्षा मध्ये एक नवीन प्रेरणा व ऊर्जा या स्नेहमेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना मिळाली.




