महाराष्ट्र

मोहित कंबोज कोणाच्या चड्डीचा नाडा सर्वांना माहिती : मिटकरी

मुंबई : मोहित कंबोज हा कोणाचा कार्यकर्ता, माणूस, कोणाच्या चड्डीचा नाडा आहे सर्वांना माहिती आहे. शेतकरी, जीएसटीच्या प्रश्नावर बोलताना ते दिसत नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. कोण आहे मोहित कंबोज असा प्रश्न उपस्थित करत मोहित कंबोजची चौकशी झाली पाहिजे. ईडी कोणाच्या घरी धाड टाकेल त्यासंबंधी ट्वीट करत असेल, पत्रकार परिषद घेणार असतील तर हे संशयास्पद आहे, असे मतही मिटकरी यांनी व्यक्त केले. मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोहित कंबोज यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ईडीच्या दारात बसून त्यांनी ही माहिती मिळवली आहे का? असा सवालही मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. मोहित कंबोज यांनी मंगळवारी काही ट्वीट केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे, असं दावा त्यांनी केला आहे. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आणखी एक ट्वीट करत कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “२०१९ मध्ये परमबीर सिंह यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरू करण्यात यावा.” या ट्वीटमध्ये कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.

आपण लवकरच एक पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहे. संबंधित नेत्याची देश आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, प्रेयसींच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी याबाबत खुलासा करणार आहे, असंही कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Fb img 1647413711531

https://fb.watch/eYtbKLTUnW/

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये