शासकीय जागा खासगी विकासकाच्या घशात न घातला त्या ठिकाणी नियोजित शासकीय कर्करोग रुग्णालयच उभे करा : स्वप्नील दुधाने
अर्बन सेल urban cell पुणेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना पत्र देत मंगळवार पेठेतील राज्य रस्ते विकास महामंडळाची जागा खासगी विकासकाच्या घशात न घातला त्याठीकणी पूर्वनियोजित शासकीय कर्करोग रुग्णालयच government cancer hospital उभे केले जावे अशी मागणी केली गेली आहे.
पुणे : नागरिकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असताना पश्चिम महाराष्ट्रासह पुणे येथे एकही शासकीय कर्करोग रुग्णालय उपलब्ध नाही. पुणे शहरातील मंगळवार पेठ येथे स्वतःची सव्वादोन एकर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य रस्ते विकास महामंडळाला हस्तांतरीत केली आहे. याच जागेवर शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने शासनाच्या हालचाली सुरू होत्या. मात्र आता ही जागा राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC च्या वतीने खाजगी विकसकाला कवडीमोल भावात ९० वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याची निविदा काढल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकाराला अर्बन सेल च्या वतीने विरोध करण्यात आला आहे.
अर्बन सेलचे पुणे शहराचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने म्हणाले की, आजमितीस पुणे शहरातील शासकीय रुग्णालयात ICU उपलब्ध होत नसताना पश्चिम महाराष्ट्रातील पहिलेवहिले साकारले जाणारे कर्करोग रुग्णालय अशा पद्धतीने सत्यात न उतरणे, नक्कीच चिंतनीय आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन अर्थात WHO च्या अंदाजानुसार भविष्यात भारतातील कर्करोगग्रस्त नागरिकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता असताना हे प्रमाण १० पैकी १ व्यक्त बाधित होण्यापर्यंत वाढू शकते. या धर्तीवर शासनाला सदर घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देणे, या नात्याने अर्बन सेलचे कर्तव्य आहे.
या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवत सदर जागेवर कर्करोग हॉस्पिटलची उभारणी करण्यात यावी आणि राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी खाजगी विकासकाला जमीन देण्याचा घातलेला घाट रद्दबातल करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
वाढते आरोग्यविषयक संकट लक्षात घेता तसेच कर्क रोग रुग्णालयाची गरज शहराला आवश्यक असल्याने या मंगळवार पेठ जागेवर कर्क रोग रुग्णालय उभारण्यात यावे अन्यथा MSRDC विरोधात पुणे अर्बन सेल तर्फे जन आंदोलन उभारुन योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिय आम्ही करु. याबाबत जन भावनेचा आदर करुन सकारात्मक निर्णय घ्यावा आहे मागणी स्वप्नील दुधाने यांनी अर्बन सेलच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.