कोथरुड

भुसारी कॉलनीतील त्या अपघाताची शहानिशा करावी ; अल्पना वरपे यांची मागणी..

पुणे : कोथरूड मधील भुसारी कॉलनीत घडलेल्या एका आकस्मित घटनेत तरुणाला आपला जीव गमावावा लागला आहे. उजव्या भुसारी कॉलनीत संयुक्त भुसारी कॉलनी मैदानात ओपन जिम साहित्याजवळ अमोल नाकते या तरुणाचा मृत्यू झाला. शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असेल तरी या घटनेची शहानिशा महापालिका प्रशासनाने करावी अशी मागणी केली जात आहे.

या भागातील माजी नगरसेविका अल्पना वरपे यांनी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे या संपूर्ण प्रकाराची शहानिशा करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

ओपन जिमजवळ एका युवकाचा मृत्यू झाला. हा मृत्यू विजेचा धक्का लागून झाला आहे असा प्राथमिक अंदाज आहे. सदर जागा हि मनपाच्या ताब्यात असल्याने महानगरपालिकेच्या विदयुत विभागाच्या माध्यमातून योग्य ती यंत्रणा लावून याची शहानिशा करावी जेणे करून असा अनुचित प्रकार पुन्हा घडू नये याकरता काळजी घेण्यात यावी अशी मागणी केली असल्याचे वरपे यांनी सांगितले.

अमोल नाकते हा मूळचा भूगाव चा रहिवाशी आहे. तो आपल्या मित्रांसह संयुक्त भुसारी कॉलनी मैदानात नियमित येत असत. सोमवार दिनांक २० मार्च रोजी रात्री आठ च्या सुमारास आपल्या मित्रांसह आलेला असताना ओपन जिम साहित्याजवळ तो अचानक कोसळला. त्याला शॉक लागला व त्यात त्याचा मृत्यू झाला असे बोलले जात आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली असून या प्रकारामागचे नेमके कारण पुढे येणे गरजेचे आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये