पुणे शहर

वारजे साहित्यिक कट्ट्याचा ५ वा वर्धापन दिन ठरला संस्मरणीय..

पुणे : पुणे शहरात सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समितीच्या वारजे साहित्यिक कट्ट्याचा ५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आठवणीतली गाणी आणि मुलांसाठी घेतलेल्या चित्र रंगवा स्पर्धेमुळे यंदाचा वर्धापनदिन संस्मरणीय ठरल्याच्या भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केल्या. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी व लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या यांच्या पाठपुराव्याने साहित्य कलेची जोपासना व्हावी, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे यासाठी पाच वर्षापूर्वी या वारजे साहित्य कट्ट्याची स्थापना करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत विविध साहित्य विषयक कार्यक्रम या कट्ट्यावर आयोजित करण्यात आले. त्यामुळेच पुणे शहरातील सर्वात सक्रिय साहित्य कट्टा म्हणून याकडे पाहिले जाते.

यंदा ५ व्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्या दिवशी आठवणीतील गाणी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीपाद कुलकर्णी व आदिती गोडबोले यांनी मधु मागसी माझ्या सख्या परी, सुरेश भट यांची हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही ही गझल, या चिमण्यांनो परत फिरा रे, मराठी अंगाई गीत कुणीही पाय नका वाजवू, बबनराव नावडीकरांनी गायलले कारण आम्ही वृध्द झालो हे जुने गीत आदी गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. संध्या बेडेकर यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले.

दुसऱ्या दिवशी लहान मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्र रंगवा स्पर्धेत सहभागी होत मुले रंगांशी समरस होऊन गेली. या स्पर्धेमुळे मुलांना रविवारची सकाळ रंगबेरंगी अनुभवता आली.

या स्पर्धेला लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यामध्ये दोन गटामध्ये जवळपास दोनशे विद्यार्थीनी सहभाग घेतला. एच.डी.एफ. सी बॅंकचे गौरव नाकील व सौ हेमा शेठ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात आली. यातील विजेत्यांना उपस्थितांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जयश्री होनराव यांनी काम पाहिले. कार्यक्रम व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डि.के.जोशी, मानसी नलावडे, जयंत मोहिते, नंदकिशोर बोधाई, सुरेश जाधव, अतुल घटवाई यांनी विशेष प्रयत्न केले.

चित्र रंगवा स्पर्धेतील विजेते
छोटा गट
पहिला क्रमांक – स्वराली सोनावणे
द्वितीय क्रमांक – शिवाय पाटील
तृतिय क्रमांक – कृष्णांत भोसले.

मोठा गट
प्रथम क्रमांक – विरेन नलावडे
द्वितीय क्रमांक – तनुश्री हेगडे
तृतिय क्रमांक – अधिराज लोणकर
चतुर्थ क्रमांक – श्रेया ठोंबरे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये