सांस्कृतिक

एका लग्नाची गोष्टला रसिकांचा उदंड प्रतिसाद अनलॉक नंतर पहिला प्रयोग

अभिनेते प्रशांत दामले , अभिनेत्री कविता लाड यांचा सत्कार

पुणे : कोरोनाच्या काळानंतर पुण्यातील नाट्यगृह सुरु व्हावीत. म्हणून आम्ही गेले अनेक दिवस प्रयत्न करत होतो.त्याला यश आले असून त्याला पुणे महानगर पालिकेचे पदाधिकारी व प्रशासनाने चांगले सहकार्य केले असून पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह , बालगंधर्वक रंगमंदिर , अण्णाभाऊ साठे नाट्यगृह हि कलावंत व रसिकांसाठी सुसज्ज झाली असून प्रेक्षक व कलावंतांची सर्व काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार आहे

एका लग्नाची गोष्ट ,प्रशांत दामले व कविता लाड यांच्या भूमिका असलेले नाट्यप्रयोग १२ डिसेंबर रोजी पुण्यात करण्यात येणार असून या नाटकाची तिकीट विक्री दोन्ही कलावंतांनी पहिल्या ५ प्रेक्षकांना तिकिटे देऊन तसेच रसिकप्रेक्षकांच्या वतीने नारळ फोडून आज करण्यात आली रसिकाने दाखवलेल्या प्रेमामुळे कोथरूड च्या प्रयोगाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला या निमित्ताने पुणेकर रसिक व संवाद पुणे नाट्य संस्थांच्या वतीने प्रशांत दामले व कविता लाड यांचा सत्कार करण्यात आला या वेळी संवाद चे सुनील महाजन , समीर हंपी,प्रवीण बर्वे उपस्थित होते सुनील महाजन यांनी पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आव्हान केले .

Img 20201114 wa0195
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये