पुणे शहर

राष्ट्रवादी युवक काँग्रेस( शरदचंद्र पवार) पक्षाचे थोरात उद्यान बाहेर बॅनर लाऊन सरकारला प्रश्न विचारित अनोख्या पद्धतीने आंदोलन 

कोथरुड येथील थोरात उद्यानातील मोनोरेल प्रकल्पास विरोध

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कोथरुड येथील थोरात उद्यानातील मोनोरेल प्रकल्पा विरोधात थोरात उद्यान बाहेर बॅनर लाऊन सरकारला प्रश्न विचारित अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

कोथरूड येथे मध्यवस्तीत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ अनेक वर्षांपासून थोरात उद्यान नामक सुंदर, मोठे आणि मनमोहक असे पुणे मनपाचे एक उद्यान स्थित आहे. हे उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागा आणि घेण्यासाठी मोकळा श्वास देत आले आहे. खुली व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी, पदपथ अशा सुविधा या ठिकाणी मनपातर्फे विकसित करण्यात आल्या असून यामुळे हे उद्यान नागरिकांच्या सोयीचे बनले आहे. 

Img 20240202 wa00034606059587729487622

परंतु गेल्या काही दिवसांपासून सदर ठिकाणी मोनोरेल साकारण्यासाठी पुणे मनपाच्या मोटार वाहन विभागातर्फे काही बांधकाम सुरू करण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी प्रस्तावित मोनोरेलसाठी वृक्षांची कत्तल केली जाणार असून अनेक ठिकाणी बांधकाम करणेही मनपाला आवश्यक आहे. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असून विरोधही केला जात आहे.सदर ठिकाणी नागरिकांतून कोणतीही मागणी नसताना हा प्रकल्प साकारला जात  आहे असे युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी बोलले.

या प्रकल्पामुळे पर्यावरणीय नुकसान तर अटळ असून याचसह मनपातर्फे आजवर विकसित करण्यात आलेल्या सुविधाही हटवल्या जातील, ज्यामुळे आजवर या सुविधांवर नागरिकांच्या कररूपी निधीतून केलेला खर्च पाण्यात जाणार आहे. एक सुजाण नागरिक म्हणून या प्रकल्पाला विरोध करत नैसर्गिक उद्यान चिरंतन ठेवणे, हे नक्कीच आमचे कर्तव्य आहे. त्वरित हा प्रकल्प थांबवण्याची सूचना केली असून असे न केल्यास भविष्यात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही गुरनानी यांनी दिला. 

Img 20240202 wa00048471904785770913928
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये