पुणे शहर

कोथरूड बस डेपो मधील शिव मंदिर अखेर भाविकांना दर्शनासाठी खुले…परिसरातील शिव भक्तांमध्ये आनंद

कोथरूड : स्वारगेट डेपो येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून सुरक्षिततेच्या दृष्टीने कोथरूड डेपो येथील शिवमंदिर महादेवाच्या दर्शनाकरिता परिसरातील नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील भाविकांची गैरसोय होत होती. हे मंदिर दर्शनासाठी खुले कारवाई अशी मागणी सातत्याने केली जात होती. अखेर हे मंदिर आज दर्शनासाठी खुले करण्यात आले. या निर्णयामुळे परिसरातील शिव भक्तांनी आनंद व्यक्त केला.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

माजी नगरसेविका अल्पना गणेश वरपे यांनी सांगितले की, दर्शनासाठी बंद केलेले हे मंदिर नागरिकांकरिता दर्शनासाठी खुले करावे या करिता पीएमपीएमएल व पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा तेव्हापासून चालू होता. परंतु नव्याने नियुक्त झालेले कोथरूड डेपोचे व्यवस्थापक सुरेंद्र दांगट यांच्या सकारात्मक  प्रतिसादामुळे आपल्या प्रयत्नाला यश आले व आज सोमवार पासून मंदिर भाविकांकरिता  रोज सकाळी ६ ते ९ व संध्याकाळ ५ ते ८ या वेळात सर्व सुरक्षिततेचे उपाययोजना करून दर्शनाकरिता खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Image editor output image1895576685 1747059695723426113878938989883

अडीच महिन्यानंतर आज आम्हाला महादेवाचा रुद्राअभिषेक करण्याचा मान मिळाला व महादेवाची आरती करून मंदिर दर्शनाकरिता खुले करण्यात आले त्याबद्दल मंदिर समितीचे गणेश वरपे  यांनी आभार मानले. नागरिकांनी हरहरेश्वर मंदिर समितीचे नियमांचे पालन करूनच निर्धारित वेळेतच दर्शनाचा लाभ घ्यावा व समितीला सहकार्य करावे असे आवाहन गणेश वरपे यांनी केले आहे.

Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये