कोथरुड

हर्षवर्धन मानकर यांच्याकडून रामबाग कॉलनीत आठवडे बाजाराचे आयोजन…

कोथरुड : pune city, Kothrud राष्ट्रवादी काँग्रेसचे कोथरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या वतीने रामबाग कॉलनी येथे आजपासून सुरू करण्यात आलेल्या शेतकरी आठवडे बाजाराला पहिल्याच दिवशी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक नागरिकांनी शेतकरी आठवडे बाजाराला भेट देत ताजा व सेंद्रिय भाजीपाला खरेदी केला.

कोथरुड मधील रामबाग कॉलनी येथे स्वप्नपूर्ती हॉल समोर दर शनिवारी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत पद्मावती आई सेंद्रिय शेती गटाच्या सहकार्याने हा आठवडे बाजार भरणार आहे. सेंद्रिय भाजीपाला, फळे, कडधान्य, मसाले, दुग्धजन्य पदार्थ स्वस्त दरात या आठवडे बाजारात नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.

Img 20211023 wa0212

याबाबत बोलताना हर्षवर्धन मानकर म्हणाले, नागरीकांना  स्वच्छ, ताजा व सेंद्रिय भाजीपाला मिळावा व त्याचा शेतकरी बांधवांनाही फायदा व्हावा अशा दुहेरी हेतूने हा आठवडे बाजार सुरू करण्यात आला आहे. यात थेट शेतातून भाजीपाला नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. एकाच ठिकाणी ताजा भाजीपाला, कडधान्य, मसाले, दुग्धजन्य पदार्थ मिळणार असल्याने नागरिकांची चांगली सोय होणार आहे.   

Img 20211022 wa0150
Img 20211019 wa0327 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये