पुणे शहर

शिवसेना उपनेते डॉ.रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे : कामगार नेते, शिवसेनेचे उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर येथे राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीने डॉ. कुचिक यांनी माझ्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला, असा आरोप केला आहे.

Img 20220217 wa0003

शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये डॉ. रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पीडित तरुणीने आपल्यासोबत घडलेला हा प्रकार सांगितला आहे. नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2022 या काळात आपल्यासोबत हा सर्व प्रकार घडला असल्याचं तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीत आणि गोव्यात हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. फिर्यादीने, माझ्यावर शारीरिक संबंध बनवून माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर केला आहे. शारीरिक संबंध ठेवले. तसेच आपण गरोदर असल्याचं कळल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने गर्भपात करुन घेतला असा आरोपही पीडित तरुणीने केला आहे.

गर्भपात (abortion) केल्याचं तसेच आपल्या संबंधांबाबत कुणालाही सांगितलं तर तुला जीवे मारेल अशी धमकी देण्यात आल्याचंही पीडित तरुणीने म्हटलं आहे. पीडित तरुणीने या प्रकरणात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आयपीसी 376, 313, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये