कोथरूडकरांची आजची कोजागिरीची सायंकाळ सप्तसुरांनी न्हाऊन निघणार..शास्त्रीय गायक राहुल देशपांडे लाईव्ह कॉन्सर्टची तयारी पूर्ण..
कोथरूड : कोथरूड करांची आजची कोजागिरीची सायंकाळ सप्तसुरांनी न्हाऊन निघणार आहे. एरंडवणा, गणेशनगर मधील देशप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने आज शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.
देश प्रेमी मित्र मंडळाचे आधारस्तंभ, मार्गदर्शक मंदार बलकवडे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले असून त्यांनी कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. या कार्यक्रमाला उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत.
एरंडवणा गणेशनगर येथे गुळवणी महाराज रस्त्यावरील गांधी लॉन्सवर आज बुधवार दिनांक १६ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमामुळे कोथरूडकरांची कोजागिरीच्या सायंकाळ यादगार ठरणार आहे. देशप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे योग्य नियोजन करण्यात आले असून सुसज्ज अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमास येणाऱ्या रसिक प्रेक्षकांची कोणती गैरसोय होणार नाही यासाठी देशप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने खबरदारी घेतली जात असल्याचे मंदार बलकवडे यांनी सांगितले.