पुणे शहर

अंबिल ओढा पुर दुर्घटनेतील मृतांना राष्ट्रवादीकडून श्रद्धांजली , घटनेला एक वर्ष पूर्ण

पुणे : २५ सप्टेंबर २०१९ रोजी पुणे शहरातील अंबिल ओढा परिसरात आलेल्या पुरात प्राण गेलेल्या नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदार संघाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेविका अश्विनी कदम, नितीन कदम, दिलीप अरूंदेकर, माजी नगरसेवक सुनील बिबवे, संतोष नांगरे, रवी चौधरी, अमोल ननावरे, गौरी जाधव, तुषार नांदे, ऋषिकेश भुजबळ, अमोल पालखे, नारायण गायकवाड, मंथन जागडे, नरेश बागुल, संग्राम वाडकर, साईल तांबोळी, प्रदीप शिवशरण आदी उपस्थित होते.

यावेळी नगरसेविका अश्विनी कदम म्हणाल्या की,  नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. ओढ्यालगत राहणारे नागरिक आजही प्रचंड मानसिक तणावात व भीतीच्या वातावरणात येथे राहत आहेत. पावसाचा जोर थोडा जरी वाढला तरी येथे घबराटीचे वातावरण निर्माण होते. परिसरातील ओढ्याची सिमाभिंत बांधणे, इतर सुरक्षेची कामे करण्यासाठी व येथील दुर्घटना ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी  पाठपुरावा करणार आहे. हीच पुरात प्राण गमावलेल्या नागरिकांसाठी खरी श्रद्धांजली असेल.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये