पुणे शहर

पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त व्याख्यान

पुणे : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा विविध पैलू असलेले एक थोर व्यक्तिमत्व म्हणून उल्लेख करता येईल. साधी राहणी आणि उच्च विचार सरणी हा त्यांचा नुसता विचार नसून स्थायी भाव होता असे मत ज्येष्ठ विचारवंत गुरूवर्य सतीश पंढरीनाथ जोशी यांनी व्यक्त केले. 

प्रभाग क्र. २८ मुकुंदनगर येथील सपंजो आश्रममध्ये भारतीय जन संघाचे संस्थापक पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जोशी बोलत होते. पंडीतजींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनावर व्याख्यान ठेवण्यात आले होते. याप्रसंगी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, नगरसेविका मानसी देशपांडे,  कवीता वैरागे,  दर्शन मिरासदार, आदी उपस्थित होते.

जोशी पुढे म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येकाने इतरांना जमेल तशी मदत करणे हाच मानवता धर्म आहे. प्रत्येकाने आपल्या वाटल्या आलेले काम प्रामाणिकपणे करून गरजूंना मदत करणे, हीच शिकवण पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिली.

जयंती निमित्त प्रभागातील लहान मुलांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी प्रभागातील राजेंद्र सरदेशपांडे, रमेश बिबवे, नितीन बेलदरे, प्रसन्न वैरागे, अनिल निळुलकर, संजय साठे, शहनवाज पिजारी, अविशान सर्वेगोड, महेश सांळुखे, नजीर शेख, जंयत पानसकर व गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचे पदाधिकारी व प्रभागातील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भाजपा पुणे शहर सरचिटणीस गणेश शेरला यांनी केले होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये