पुणे शहर

भारतीय कापड वारसा आणि तो विणणाऱ्या महिलांचे जीवन समृद्ध करणाऱ्या प्रीती पवार यांच्या यशाची अनोखी कथा

जागतिक महिला दिन महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक कामगिरीचा गौरव करतो आणि पुण्यात उद्योजिका प्रीती दत्तात्रय पवार या प्रेरणेचे एक उत्तम उदाहरण म्हणून उभ्या आहेत. मूळच्या नागपूर जवळील अकोला या छोट्या शहरात जन्मलेल्या प्रीती यांचा भारतीय वस्त्रोद्योगातील यशाचा प्रवास हा जिद्द आणि कष्टाची एक अनोखी कथा आहे.

त्यांची व्यावसायिक पार्श्वभूमी वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांनी टेक्सटाईल मधील पदवी आणि मानसशास्त्र विषयातील पण पदवी यांचा सुरेख संगम साधला आहे. या दुहेरी अभ्यासामुळे त्यांना मानवी स्वभाव आणि सौंदर्याचे सखोल आकलन करून डिझाइनकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. प्रीती यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात कोथरूड येथून केली. सुरुवातीच्या काळात भांडवलाचे मोठे आव्हान असताना त्यांना त्यांच्या पालकांची खंबीर साथ मिळाली. कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच त्यांना सी एन बी सी इमर्जिंग इंडिया पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आणि फेमिना मासिकाने त्यांची डिझायनर विथ अ कॉज म्हणून दखल घेतली.

Img 20260222 wa00062978283752993033682

गेल्या दोन दशकांत त्यांनी हँड ब्लॉक प्रिंटिंग म्हणजे हाताने केली जाणारी छपाई, या क्षेत्रात स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. ही एक अत्यंत कष्टाची कला असून यामध्ये कधी कधी एक साडी पूर्ण व्हायला तब्बल आठ दिवस पण लागतात. राजस्थानची दाबू, मध्य प्रदेशची बाग प्रिंट आणि आंध्र प्रदेशची कलमकारी अशा पारंपरिक भारतीय कलाकुसरीला त्यांनी पुण्यातील औंध येथील आपल्या स्टुडिओद्वारे आधुनिक वधूवस्त्रे  आणि गृहसजावटी म्हणजे फर्निशिंग मध्ये स्थान मिळवून दिले आहे. 

डिझाइनच्या पलीकडे जाऊन मानसशास्त्रातील आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी अनेक महिलांना मार्गदर्शन केले आहे, त्यांना प्रशिक्षित करून रोजगार दिला आहे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव जागतिक स्तरावर असून, पुण्यापासून दुबईपर्यंत त्यांचे विद्यार्थी या कलेचा सराव करत आहेत. स्पोर्ट्स अपॅरेल आणि पारंपारिक वस्त्रकला यांचा मेळ घालत प्रीती पवार भारतीय कापड वारसा आणि तो विणणाऱ्या महिलांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य सातत्याने करत आहेत.

Img 20260305 wa03081177892995602408429

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये