महाराष्ट्र

मग तळपायाची आग मस्तकात का जाते ? उध्दव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

मुंबई : ‘तुम्ही अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना कलंक लावत असता, मग ते कुटुंब कलंकित होत नाही का? त्यामुळे जर तुम्हाला कलंक म्हटलं तर इतकी तळपायाची आग मस्तकाला जाण्याचं कारण काय?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित करत भाजपला फटकारलं आहे.

‘आधी एखाद्या कुटुंबावर गंभीर आरोप करून त्यांना कलंकित करून टाकायचं आणि नंतर त्यांच्यावर दबाव टाकून आपल्या पक्षात घेऊन मानाचं पान द्यायचं. पण असं करून ते ताठ मानेनं लोकांसमोर जाऊ शकतील का? त्यामुळे आधी असे निराधार आरोप करणं तुम्ही बंद करा. मागे मी बोललो होतो की दिल्लीतून अफझल खानाच्या फौजा आल्या आहेत. अफझल खानाच्या वेळी दबाव टाकून धर्मांतर केलं जायचं. आता दबाव टाकून पक्षांतर करून घेतलं जात आहे,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

Img 20230707 wa00097391429386569165714

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे. यावरूनही उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. ‘ज्यांच्यावर तुम्ही ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यांच्याच हस्ते पुरस्कार घेणार. मग आधीच्या आरोपाचं काय झालं?’ असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे.

Img 20221228 wa00016208176808646242256

विदर्भ दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक क्लिप ऐकवली. ‘राष्ट्रवादीसोबत आमची युती कधीही शक्य नाही’, असे फडणवीस त्यात म्हणाले आहेत. हा धागा पकडत, ‘सध्या फडणवीस यांची स्थिती सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी विचित्र झाली आहे’, असे उद्धव म्हणाले. ‘नागपुरात पैसे हवे असतील तर गावठी कट्टा गहाण टाकावा लागतो, अशी माहिती आमचे नेते अंबादास दानवे यांनी मला दिली. ते ऐकून मला धक्काच बसला. शेतकऱ्याला पैसे हवे असतील तर त्याची जमीन, घर किंवा पत्नीचे मंगळसूत्र गहाण टाकावे लागते. पण इकडे गावठी कट्ट्यावर पैसे देणारी अवलाद गृहमंत्र्यांच्या गावात आहे. हे आपलं दुर्भाग्य आहे’, असे म्हणत, ‘फडणवीस हे नागपूरसाठी कलंक आहेत’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.

Img 20230708 wa0003
Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये