अनलॉक ४.० चे नवीन नियम जाहीर
नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेले निर्बंध लॉकडाऊन आता आणखी शिथील होणार आहेत. अनलॉक ४.० संदर्भात केंद्र सरकारने नवीन नियम जाहीर केले आहेत. येत्या १ सप्टेंबर पासून लॉकडाऊन चे नियम आणखी शिथील होणार आहेत.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता मुभा असेल. तसंच राज्यांतर्गत प्रवासासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.असे केंद्र सरकारच्या गाईडलाईन मध्ये सांगण्यात आले आहे.
नव्या नियमांमध्ये ३० सप्टेंबर पर्यंत शाळा बंद राहतील .असं सांगण्यात आले आहे .मात्र मेट्रो ७ सप्टेंबर पासून सुरू करता येऊ शकेल. शाळा बंद असल्या तरी अनलॉक ४ मध्ये नववीच्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल तेव्हा शाळेत जायची परवानगी देण्यात आली आहे.एका राज्यात जायला इ -पास किंवा परवानगी ची गरज नाही.
असे आहेत नवे नियम
थिएटर ,मनोरंजन केंद्र ,स्विमिंग पूल बंदच राहणार आहेत. शाळा देखील बंद राहणार आहे. पण एका वेळी 50% शिक्षकांना शाळेत यायला परवानगी आहे.
ऑनलाइन शिक्षणासंदर्भात कामासाठी निम्मे शिक्षक शाळेत जाऊ शकतात.नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल.त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगी सह शाळेत यायला परवानगी शिक्षकांकडून मार्गदर्शन पुस्तक किंवा इतर साहित्य घेण्यासाठी माध्यमिक शाळेतले विद्यार्थी पालकांचे परवानगीने शाळेत शिक्षकांना भेटायला जाऊ शकतात.
वय वर्षे 65 आणि त्या पुढच्या व्यक्तींनी ज्यांना काही आजार आहेत.अशांनी आणि दहा वर्षाच्या आपल्या मुलांनी घरातच राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



