पुणे शहर

वास्तवाचा वेध घेणारे माध्यम म्हणजेच माहितीपट : प्रदीपकुमार माने

वारजे : आजच्या यंत्राधिष्ठित माध्यमांच्या युगात वास्तवाचा वेध घेणारे माहितीपट तयार होणे आवश्यक आहे. लघुपट व माहितीपट ही अभिव्यक्तीची वेगवेगळी माध्यम आहेत. माहितीपटातून त्या त्या काळातील समाजाचं दस्ताऐवजीकरण होत असतं. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहितीपट निर्मिती प्रक्रिया आत्मसात करणे आवश्यक आहे. असे मार्गदर्शन मार्गदर्शन प्रा. प्रदीपकुमार माने यांनी केले. Documentary is a medium for observing reality: Prof. Pradeepkumar Mane

संस्कार मंदिर महाविद्यालय वारजे-माळवाडी मराठी विभागाच्या वतीने जागतिक मराठी दिनानिमित्त ‘माहितीपटाची निर्मिती प्रक्रिया’ या विषयावर प्रा. प्रदीपकुमार माने यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र थोरात यांनी जागतिक मराठी दिन आयोजित करण्याचा उद्देश प्रास्ताविकातून कथन केला.

1 march

ऑनलाईन व्याख्यानाचे अध्यक्षस्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख डाॅ प्रभाकर देसाई यांनी भूषविले. यावेळी देसाई म्हणाले,’ युवा पिढीने अधिक सजगतेने माहितीपटाकडे पहावे. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी तंत्रस्नेही होणे आवश्यक आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित काळंगे तर परिचय डाॅ ललिता कानगुडे यांनी केला.आभार प्रा. प्राजंली विद्यासागर यांनी मानले. प्रा.किरण गाढवे, मराठी विभागाचे डाॅ. बळते यांचे तांत्रिक साहाय्य लाभले…..

Img 20210223 wa0156
Img 20210228 wa0015

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये