कोथरुड

कर्वेनगर मधील जय गणेश मित्र मंडळाने घेतलेल्या लसीकरण मोहिमेत ४१० नागरिकांचे लसीकरण..

कर्वेनगर : pune city, karvenagar कर्वेनगर मधील भारत कॉलनी येथील जय गणेश मित्र मंडळ, तसेच हिंगणे होम कॉलनीतील श्री मित्र मंडळाने सेवा आरोग्य फाऊंडेशन, संजीवन हॉस्पिटल, सीरम इन्स्टीट्युट, पीपीसीआर, बाळासाहेब देवरस पॉलीक्लीनिक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित वज्रनिर्धार २०२१ लसीकरण महाअभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत  ४१० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. Vaccination of 410 citizens in the vaccination campaign conducted by Jai Ganesh Mitra Mandal in Karvenagar

मंडळाचे कार्यकर्ते अक्षय बलकवडे, अक्षय मतकर, नितीन पासलकर, आकाश शिळिमकर, ऋषिकेष पवार, मनोज जायगुडे यांनी या लसीकरण मोहिमेचे नियोजन केले होते. यावेळी परिसरातील नागरिकांचे नियोजनपूर्वक लसीकरण करण्यात आले. 

जय गणेश मित्र मंडळ यंदा ३३ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मंडळाचे अध्यक्ष अक्षय बलकवडे म्हणाले की, दरवर्षी गणेशोत्सवा निमित्त गणेश मंडळ विविध उपक्रम राबवत असते. त्यात रक्तदान शिबीर, गरजू लोकांना अन्नदान, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर असे विविध उपक्रम राबविले जातात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या वर्षी मंडळाच्या वतीने भारत कॉलनी मध्ये लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. 

Img 20210913 wa0011 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये