राजकीय

शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणार? शिवसेना वंचित आघाडीच्या युतीबाबत सकारात्मक चर्चेला सुरुवात

पुणे : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युती-आघाडी बाबत सकारात्मक चर्चेला सुरुवात वंचित बहुजन आघाडीची शिवसेना सोबत युती-आघाडी करण्याबद्दल चर्चा सुरु आहे. या बाबतीत वंचित बहुजन आघाडीच्या बाजुने आम्ही आमचा होकार कळवला आहे. आमच्या वतीने पक्षाचे राज्य कमिटीचे सदस्य महेंद्र रोकडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांची शिवसेनेचे नेते व माजी मंत्री सुभाष देसाई तसेच त्यांचे काही खासदार यांच्या बरोबर दोन बैठका झाल्या आहेत. त्यात युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली आहे.

Img 20221126 wa0212847205965836399706

शिवसेना नेते सुभाष देसाई हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना येऊन भेटले. त्यांच्यातही दोन बैठका झाल्या असुन युती संबंधी सकारात्मक चर्चा झाली आहे. सध्या या टप्प्यावर बोलणी झाली आहेत. आम्ही शिवसेनेला हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे की, वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्र विकास आघाडीचा भाग बनविणार आणि चार पक्षीय आघाडी करून निवडणूक लढवणार की, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे मिळून निवडणुका लढवणार हे स्पष्ट करायला सांगण्यात आले आहे. या बाबतीतला निर्णय त्यांच्याकडून समजला की पुढच्या टप्प्याची चर्चा सुरु होईल.

Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये