पुणे शहर

महापालिकेवर प्रलंबित मागण्यांसाठी बालवाडी शिक्षिका, सेविका व रोजंदारी रखवालदार, शिपाई यांची निदर्शने..

पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त)च्या वतीने आक्रोश निदर्शने

पुणे : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडे बालवाडी शिक्षिका सेविका तसेच रोजंदारी रखवालदार शिपाई यांच्या प्रलंबित प्रश्नां संदर्भात महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त)च्या वतीने आक्रोश निदर्शने करण्यात आली. या आक्रोश निदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात बालवाडी शिक्षिका सेविका तसेच रोजंदारी रखवालदार शिपाई सहभागी झाले होते.

या निदर्शनामध्ये युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट म्हणाले की,”पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाबरोबर बालवाडी शिक्षिका व सेविका तसेच रोजंदारी रखवालदार शिपाई यांच्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही कित्येक वेळा चर्चा केल्या निवेदने दिली तरीही प्रशासन प्रश्न सोडवायला तयार नाही त्यामुळे आम्ही आता न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी सज्ज झालेलो आहोत, तसेच यांच्या प्रश्नाच्या संदर्भात गांभीर्याने व जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले तर आम्ही आता ते प्रशासनाची वेळ काढून भूमिका मान्य करणार नाही त्यामुळे आम्ही दर महिन्याला महानगरपालिकेच्या मुख्य द्वारासमोर येऊन निदर्शने करण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे.

” सदर मागण्यांचे निवेदन अतिरिक्त महापालिका रवींद्र बिनवडे यांना समक्ष भेटून देण्यात आले. तसेच या प्रश्नाच्या संदर्भात अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी सकारात्मक भूमिका घेऊन चर्चा केली. सदर चर्चेदरम्यान पंधरा दिवसात महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. सदर आक्रोश निदर्शनामध्ये कामगार युनियनचे संयुक्त चिटणीस कॉ. मधुकर नरसिंगे, कॉ. रोहिणी जाधव, उपाध्यक्ष कॉ. शोभा बनसोडे, कॉ. सुदाम गोसावी, कॉ. दिलीप कांबळे, कॉ. वैजीनाथ गायकवाड, विभागीय अध्यक्ष राम अडागळे, कॉ. रमेश पारसे, कॉ. अजित मेंगे, सचिव कॉ. ओंकार काळे, कॉ. कालावती खाटपे, कॉ. सिद्धार्थ प्रभुणे, कॉ. प्रिया ठाकर, कॉ. भरत ठोंबरे इत्यादी पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले.

या आहेत मागण्या

बालवाडी शिक्षिका व सेविका महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये गेली वीस वर्षांपासून तुटपुंज्या एकवट वेतनावर काम करत आहेत. त्यांना कोणत्याच प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत, बालवाडी शिक्षिका व सेविका यांना महापालिका आयुक्त यांच्या मान्य परिपत्रकानुसार १०% वेतन वाढ अदा केली जात नाही ती वाढ सप्टेंबर २०२२ पासून अदा केली नाही तर ती वाढ फरका सहीत अदा करण्यात यावी, बालवाडी सेविका शिक्षिका यांना १२ वर्षे पूर्ण झाल्यावरची पगार वाढ देणे, निव बजाज फायनान्स प्रकल्प या संस्थेने बालवाडीच्या वर्गात हस्तक्षेप करू नये, बालवाडी शिक्षिका सेविका या महिला वर्ग असल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे अंशदायी वैद्यकीय साह्य योजनेचा लाभ देण्यात यावा, वेतन चिठठी , ओळखत्र द्यावे, मेडिकल रजा, बाळंतपणाची रजा द्यावी तसेच भविष्य निर्वाह निधी, किमान वेतन, सेवानिवृत्त बालवाडी शिक्षिका सेविका यांचा थकीत बोनसची रक्कम त्वरित अदा करावी, रोजंदारी सेवकांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतन दर निश्चित करून तो तात्काळ द्यावा, शिक्षण विभाग- प्राथमिक कडील शिक्षकेतर सेवकांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता त्वरित देण्यात यावा, मागील चार वर्षापासून अनुकंपा तत्वाने एकूण १४ सेवकांना सेवेत समाविष्ट करून घेण्यात याव, शिक्षण विभागाकडून बालवाडी शिक्षिका सेविका रोजंदारी शिपाई रखवालदार व अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा पंधरा तारखेनंतर अदा केले जाते त्यामुळे त्यांना कर्जाचे हप्ते भरताना अडचणीचा सामना करावा लागतो. त्यांचे वेतन वेळेत करावे, शिपाई व रखवालदार यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी. या सर्व प्रश्नांच्या संदर्भात युनियनच्या वतीने प्रशासनाबरोबर अनेक वेळा पत्र व्यवहार करून तसेच चर्चात्मक बैठका घेऊनही प्रश्न सोडविले जात नाही असा आरोप युनियनने केला आहे.

सदर आक्रोश निदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात बालवाडी शिक्षिका सेविका तसेच रोजंदारी रखवालदार शिपाई उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले व समारोप शोभा बनसोडे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या अशा वागण्याचा अजित पवारांनी केला संताप व्यक्त पहा व्हिडिओ
Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये