पुणे शहरराजकीय

मनसेचे अंजनेय साठे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंजनेय साठे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथे टिळक भवनात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज (शनिवारी) काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या युवा नेत्याचे स्वागत नाना पटोले यांनी पुष्पगुच्छ आणि काँग्रेसचे तिरंगी उपरणे देऊन केले. याप्रसंगी महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल, माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, आमदार प्रणिती शिंदे आदी उपस्थित होते.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

समाजकारण, राजकारण या क्षेत्रात कार्यरत असणारे अंजनेय साठे यांनी काँग्रेसच्या विचारधारेशी बांधिलकी मानली. त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत, असे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.

अंजनेय साठे यांचे वडील डॉ.सुनील साठे आणि आई डॉ.अर्चना साठे हे दोघेही सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत. अंजनेय साठे यांचे पणजोबा स्वर्गीय विनायकराव साठे हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सात वर्षे तुरुंगवास भोगला होता. कै.विनायकराव साठे यांनी तत्कालीन सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री पद भूषविले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये