आंतरराष्ट्रीय

भारत, चीनमध्ये प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू

पुणे : भारत, चीनमध्ये प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशात प्रदूषणामुळे वर्षांला अनुक्रमे २.४ दशलक्ष आणि २.२ दशलक्ष मृत्यू होत आहेत. एकूण मृत्यूंपैकी तीन चतुर्थाश मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे झाले आहेत. 

कोळशावर आधारित वीज प्रकल्प, स्टील कारखाने यासारखे स्थिर स्त्रोत आणि कार, ट्रक व बस हेदेखील वायू प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहेत. वाहने आणि ऊर्जा निर्मितीतून विषारी वायूचे उत्सर्जन वाढत आहे, असेही या अभ्यासात नमूद आहे. ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ जर्नल’मधील नवीन अभ्यासानुसार, अमेरिका अव्वल दहा राष्ट्रांमध्ये एकमेव परिपूर्ण औद्योगिक देश आहे. मात्र तेथेही प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या जास्त आहे. कार, ट्रक आणि उद्योगातील दूषित हवेमुळे मृत्यूची संख्या ५५ टक्क्यांनी वाढली आहे.

प्रदूषणविरहित वाहनांचा, सार्वजनिक वाहतुकीचा वापर आणि वैयक्तिक वाहनाचा कमीत कमी वापर या बाबी महत्त्वपूर्ण असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

Img 20220519 wa0035
Img 20220518 wa0013505028502486174026

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये