महाराष्ट्र

ससुन रक्त पेढीतील प्लाझ्मा पुणेकर रुग्णांना उपलब्ध करा.- मनसेची मागणी


पुणे : पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.अनेक रुग्णांना करोना साठी इंजेक्शन व प्लाझ्मा दाता उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांचे जीव जात आहेत.

ससुन हाॅस्पीटल मधे ११० प्लाझ्मा पिशवी शिल्लक असताना ही बाहेरील रुग्णांना  उपलब्ध देणे गरजेचे आहे.पुणे जिल्हातील रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी  प्लाझ्मा लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावा.अशी मागणी मनसेच्या प्रशांत कनोजिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

कनोजिया म्हणाले, ससुन रुग्णालयात पुणेकरांनी प्लाझ्मा दान केला आहे.मग त्यावर पुणे जिल्हयातील प्रत्येक नागरीकांचा अधिकार आहे.११० पिशवी प्लाझ्मा शिल्लक असताना रुग्णांच्या नातेवाईकांना शोधत फिरावे लागत आहे.आणि कित्येक रुग्णांना ना इंजेक्शन भेटत आहे ना प्लाझ्मा व त्यांचे जीव जात आहेत.११० जणांचे जीव वाचु शकतील. इतका प्लाझ्मा ससुन मध्ये शिल्लक आहे.
त्याच्यावर सर्वांचा अधिकार आहे. तरी तातडीने शहरातील रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करुन द्यावा. याबाबतीत कनोजिया यांनी राज्य शासनाला निवेदन दिले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये