शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकरची भावनिक पोस्ट

मुंबई : रात्रीस खेळ चाले २ या मालिकेने रसिकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक लाभला. या मालिकेत घडणाऱ्या घटनांची चर्चा कायमच रसिकांमध्ये होताना पहिला मिळाली. या मालिकेतून घराघरात पोहचलेले पात्र म्हणजे शेवंता. हि भूमिका अपूर्वा नेमळेकर या अभिनेत्रीने साकार केली होती. हि मालिका संपल्यानंतर अपूर्वा ने एक भावनिक पोस्ट इंस्टाग्राम वर पोस्ट करत चाहत्यांशी संवाद साधला आहे. या पोस्ट मध्ये तिने पाणावलेल्या डोळ्यांचे स्वतःचे छायाचित्र टाकले असल्याने या मालिकेला ती खूप मिस करणार आहे हेच दिसून येत आहे.
इन्स्टावरील आपल्या पोस्ट मध्ये अपूर्वानं म्हणजे शेवंताने म्हंटल आहे की, नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी आशा करते की आपण आपली आणि आपल्या जिवलगांची काळजी घेत आहात. वेळ कठीण जरी असेल तरी आपण पुन्हा जोमाने उभे राहुया. आपली लाडकी मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले २ ही आज आपला निरोप घेत आहे.हे लक्षात येताच खूप आठवणी आज पुन्हा दाटून आल्या आहेत. ह्या मालिकेचा एक अविभाज्य भाग म्हणून मी झी मराठीचे मना पासून आभार मानते. त्याच बरोबर मी मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते ह्यांचे सुद्धा खूप आभार मानू इच्छिते. आणि आपण माय बाप प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्या बद्दल आपले मनापासून आभार. मालिका समाप्ती ला आली हे समजायला कठीण तर जात आहेच पण त्याच बरोबरच खूप साऱ्या आठवणींना पूर्णविराम मिळणार आहे.
हि मालिका स्वीकारण्याचे कारण सांगताना ती म्हणते की,
पहिल्या भागाचे गुपित ह्या भागात उलगडणार आहे. शेवंता ह्या भूमिकेचे महत्त्व हे वेगळ्या प्रकारची जबाबदारी स्वीकारून मी पुन्हा टीव्ही वर यायचे ठरवले. जबाबदारी म्हटली की दडपणाखाली असणे साहजिक होते. पण त्यातून आपली ओळख पुन्हा निर्माण करायची एक सुवर्ण संधी ह्यातून मला दिसली.आणि त्याला दिलेला प्रतिसाद त्याची पावती देऊन गेला.
अपूर्वा म्हणते शेवंंताचे विविध रंगी पैलू साकारताना तिच्या व्यक्तीरेखा बद्दल फक्त आपण ऐकले होते, पण ही भूमिका रंगवताना त्यामध्ये माझ्या अभिनयाचे रंग चढतच गेले. एक कलाकार म्हणून आयुष्यभर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करेन , बस तुमची साथ कायम राहावी हीच विनंती. माझा पॅकअप झाल्या नंतर काढलेला हा आशीर्वाद स्वरूप फोटो आणि आज मस्तिष्का वर पडलेले ही पुष्प पाकळी यांने माझे मन गहिवरून गेले, असल्याचे अपूर्वा हिने म्हंटले आहे.



