राष्ट्रीय

चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा

गाझियाबाद : येथील सिटी फॉरेस्टमध्ये 1 डिसेंबर 2022 रोजी चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्याला न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. सोनू गुप्ता (वय 20) असे आरोपीचे नाव असून तो मजूर आहे. त्याला व्हाईटनर ओढायचे व्यसन आहे. न्यायालयाचा हा निर्णय दोन महिन्यांनी आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने न्यायालयात दररोज सुनावणी होत होती.

साहिबाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिटी फॉरेस्ट परिसरात कच्च्या वसाहती आहेत. येथे एका गवंडीचे कुटुंब राहते. या कुटुंबातील 4 वर्षांची मुलगी 1 डिसेंबर 2022 रोजी घराबाहेर खेळत होती. अचानक ती संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाली. 2 डिसेंबर 2022 रोजी त्याचा मृतदेह घरापासून 150 मीटर अंतरावर पडलेला आढळून आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्काराची पुष्टी झाली. 7 डिसेंबर 2022 रोजी पोलिसांनी या घटनेचा तपास करताना सोनू गुप्ताला अटक केली.

चौकशीत आरोपीने सांगितलं की, त्यादिवशी या जंगलात आला होता. त्यावेळी काही महाविद्यालयीन मुलं मुली तिथं आली होती. त्यावेळी आरोपीने व्हाईटनर ओढले होते. नशेचा अंमल झाल्यावर तो महाविद्यालयीन ग्रुपमधील एका मुलीच्या मागे जाऊ लागला. ती मुलगी सावध झाली आणि ती घरी निघून गेली, नंतर आरोपी सोनू गुप्ता सावज शोधू लागला, त्याला एक लहान मुलगी घराबाहेर फुले तोडत असलेली दिसली, त्याने तिला उचललं आणि हाताने तोंड दाबून ठेवलं. ही घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्याने मुलीने आरडा ओरडा करू नये म्हणून तिच्या तोंडात डायपर कोंबला होता. मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोरीने गळा आवळून तिचा खून केला.

विशेष सरकारी वकील संजीव बखरवा यांनी सांगितले की, पोलिसांनी अशा मानवतेला काळिमा फासणाऱ्या या गुन्ह्यात 15 साक्षीदार हजर केले होते. आरोपीचा माग उलगडण्यासाठी पोलीस पथकांना घटनास्थळाच्या ५ किमी परिघातील ३०० सीसीटीव्ही च्या क्लिप स्कॅन कराव्या लागल्या.जलदगती न्यायालयाच्या धर्तीवर या प्रकरणाची दररोज सुनावणी झाली. त्यामुळे पोलिसांनी दोषारोपपत्र सादर करताच न्यायालयाने या फाईलची तातडीने दखल घेतली आणि दररोज सुनावणी घेण्यात आली. आठवडाभरापूर्वी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. कोर्टाने 3 फेब्रुवारी 2022 रोजी सोनू गुप्ता याला बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरवलं. ४ फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश अमित कुमार प्रजापती यांनी सोनू गुप्ता याला फाशीची शिक्षा सुनावली.

Fb img 1647413711531 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये