पुण्यात मनसे मध्ये इंनकमिंग सुरू; या पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

पुणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये इंनकमिंग सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. कोथरूड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व हिंदू युवा संघटनेचे अध्यक्ष तन्मय मेमाणे यांनी लक्ष्मीताई दुगल, अविनाश जाधव, संदिप पाटील, कृष्णा कुलकर्णी, सुनील दास यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे ह्यांच्या नेतृत्वाखाली मनसे पक्षात प्रवेश केला आहे.
याबाबतीत बोलताना सुधीर धावडे म्हणाले , राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व हिंदू युवा संघटनेचे अध्यक्ष तन्मय मेमाणे यांनी लक्ष्मीताई दुगल, अविनाश जाधव, संदिप पाटील, कृष्णा कुलकर्णी, सुनील दास यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज पक्षात प्रवेश केला आहे. यापुढील काळात आणखी प्रवेश होणार असून अनेक लोक संपर्कात आहेत.
यावेळी मनसे नेते राजेंद्र वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रदेश सचिव योगेश खैरे, मनविसे शहराध्यक्ष अमोल शिंदे ,विभाग अध्यक्ष सुधीर धावडे यांच्या हस्ते ह्या सर्वांचा प्रवेश झाला.







