महाराष्ट्र
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; कोयना धरणापासून 20 किमी अंतरावर धक्के

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात आज (16 ऑगस्ट) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज (16 ऑगस्ट) सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 6.40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. मॉर्निग वाॅकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंप धक्के जाणवले असून धरण सुरक्षित आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.













