राष्ट्रीय

इंधन टंचाई : भारतातील ‘या’ शहरात नागरिकांसाठी मोफत बससेवा

इंधन दरवाढीपासून नागरिकांना दिलासा मिळावा आणि वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढून इंधनाची बचत व्हावी यासाठी भारतातील एका शहरात मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे. दमण प्रशासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर मोफत सार्वजनिक परिवहन बससेवा सुरू करण्यात आली आहे. स्थानिक प्रवाशांसोबत अन्य राज्यातून व परदेशातील पर्यटकांनाही याचा लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दमण शहरातील विविध भागात यामुळे नागरिकांना मोफत जाता येणार आहे. दमण शहरात होणारी वाहतूक यामुळे कमी होईल. प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संरक्षणास मदत होईल. परिवहन अधिकारी कवलजीत सिंह, दमण नगरपालिकेच्या अध्यक्षा दीपिका बेन टंडेल, काउंसलर अस्पी दमनिया, फिरदौस बेन आदी या बससेवेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. या नवीन मोफत बससेवेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Img 20260222 wa00066848182455129944891

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये