कोथरुड

कमी वयात मनात समाजसेवेची भावना असणे प्रशंसनीय : छाया मारणे

नवोदय जनसेवा फाऊंडेशनच्या कार्यालयाचे मारणे यांच्या हस्ते उद्घाटन

कोथरूड : मित्राच्या स्मरणार्थ सामाजिक संस्था स्थापन करून समाजसेवेचा विडा उचलणाऱ्या किशोरवयीन मुलांनी नवोदय जनसेवा फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे. आर्थिक अडचण असलेल्या मुला मुलींना शिक्षणासाठी मदत करण्याचे संस्थेकडून ठरवण्यात आले आहे.

या मुलांनी स्थापन केलेल्या नवोदय जनसेवा फाऊंडेशन या संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन नगरसेविका छाया मारणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेबद्दल माहिती देत असताना सर्व सभासदांनी सांगितले की, ही संस्था गोरगरीब व शिक्षणासाठी आर्थिक अडचण असलेल्या मुला मुलींना मदत करणार असून संस्थेमार्फत मोफत वाचनालय, संस्कार वर्ग, अभ्यासिका चालवल्या जाणार आहेत. 

Img 20201114 wa0195

या मुलांच्या कामाचे कौतुक करताना मारणे म्हणाल्या की,  कमी वयात समाजाची सेवा करावी अशी भावना या युवकांच्या मनात येणे हे देखील खूप प्रशंसनीय आहे. ते करत असलेल्या सामाजिक कामात सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.

या प्रसंगी अतुल शिंदे, शुभम मोहोळ, काशिनाथ बानगुडे, वैभव कांबळे,  नवोदय जनसेवा फाऊंडेशनचे मार्गदर्शक उमाकांत शेळके, श्याम धुमाळ , नारायण शिंदे, अध्यक्ष रोहित मोढवे, उपाध्यक्ष पूजा मारणे, सचिव सौरभ पासलकर, कार्याध्यक्ष शुभम मरगळे, खजिनदार तेजस सावंत व संस्थेचे सर्व सभासद व सदस्य उपस्थित होते.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये