राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिरम भेटी कडे देशाचे लक्ष ; असा आहे दिवसभरातील कार्यक्रम

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना लसीचा आढावा घेण्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. साऱ्या देशाचे या भेटीकडे लक्ष लागले आहे. कोरोना चा संसर्ग सुरू झाल्यापासून त्यावर मात करणाऱ्या लसीच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. सिरम इन्स्टिट्युट मध्ये कोरोना वरील लस तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे सिरमला भेट दिल्यानंतर मोदी काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बॉम्ब शोधक नाशक पथकाने सिरम इन्स्टिट्युट परिसराची तपासणी केली आहे. आज दुपारी मोदी सिरम ला भेट देऊन लसीचा आढावा घेणार आहेत.

पंतप्रधान राज्यात आल्यानंतर राजशिष्टाचारानुसार तेथील मुख्यमंत्री व राज्यपाल त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असतात परंतु मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या विनंतीनुसार कोरोना काळातील ही अल्प कालावधी भेट असल्याने स्वागतासाठी येऊ नये असा निरोप असल्याची माहिती आहे.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm

पंतप्रधान पुणे दौरा

दु. 3:50 वा. पुणे विमानतळावर आगमन
दु. 3:55 वा. हेलिकॉप्टरने सिरम इनस्टिट्यूट(मांजरी)कडे रवाना
दु. 4:15 वा. मांजरी हेलिपँडवर उतरणार, सिरम इनस्टिट्यूटकडे रवाना
दु. 4:25 वा. सिरम इनस्टिट्यूटमध्ये आगमन
दु. 4:25 ते संध्या. 5:25 वाजेपर्यंत सिरम इनस्टिट्यूटची पाहणी
संध्या. 5:30 वा. पुणे विमानतळाकडे रवाना
संध्या. 5:55 वा. पंतप्रधान दिल्लीला रवाना होणार

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 35 pm

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये