कोथरुड

दीपक मानकर यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानामुळे कोथरुडमधील राऊतवाडी येथील आगीवर नियंत्रण ; मोठी दुर्घटना टळली…

कोथरुड : हनुमाननगर राऊतवाडी येथे घरातील वॉटर हिटर चालू राहिल्यामुळे लागलेल्या आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणालाही इजा झाली नाही. झोपडपट्टी भाग असल्याने आग पसरण्याचा धोका होता. मात्र स्थानिक नगरसेवक दीपक मानकर व दिवा प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून स्थानिक महिला, गणेश मंडळाचे कार्यकर्ते बरोबर घेऊन अग्निशमन दलाच्या जवणांबरोबर आग विझविण्याचा प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टाळला. Controlling the fire at Rautwadi in Kothrud due to the vigilance of Deepak Mankar’s activists;  A major accident was averted.

राऊतवाडी भागात राहणारे तुकाराम क्षीरसागर हे सायकल वरून घरोघरी जाऊन भाजी विकण्याचा व्यवसाय करतात. आज अचानक त्यांच्या घरात आग लागली.  धूर येऊ लागला त्यामुळे शेजारील लोक सतर्क झाले व काही मंडळींनी दिपक मानकर” यांच्या कार्यालयात संपर्क केला व आगीची माहिती दिली. दीपक मानकर यांचे स्वीय  सहाय्यक दिलीप कानडे  यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस यंत्रणा व अग्निशामक दल यांना फोन करून तातडीने घटनेची माहिती दिली.

पण संपूर्ण भाग हा वस्तीचा असल्याने “अग्नीशामक दलाची” गाडी लगेच पोहचू शकणार नाही याची कल्पना असल्याने कानडे यांनी लगेच जवळच राहणाऱ्या “दिवा प्रतिष्ठान” चे कार्यकर्ते व दिपकभाऊ मानकर मित्र परिवारातील सदस्यांना तातडीने फोन करून झालेल्या दुर्घटनेची माहिती देऊन तातडीने मदत करण्यास सांगितले.  कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक महिला व लोकांच्या मदतीने आगीवरती नियंत्रण आणत असताना शेजारील सर्व लोकांचे पाणी साठविण्यासाठी भरलेल्या टिपाडातील पाणी बादलीने आगीवर फेकत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केला. अग्निशमन ची गाडी घटनास्थळी पोहचू शकली नसली तरी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून कार्यकर्त्यांच्या समवेत प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

या बाबतीत हर्षवर्धन मानकर म्हणाले, नागरिकांनी घरातील  वॉटर हिटर सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांनी आज प्रयत्न करत घराला लागलेली आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Img 20210319 wa0097

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये