पुणे शहर

राहूल देशपांडे यांच्या संगीत मैफिलीने रसिक श्रोते मंत्रमुग्ध

पुनीत जोशी यांच्या वतीने स्वर संकल्प संगीत मैफिलीचे आयोजन

पुणे : भारतीय जनता पार्टी कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीत श्रीकांत जोशी व युवा सुराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे यांच्या “स्वर संकल्प” या संगीत मैफिलीचे शुभारंभ लॉन येथे आयोजन करण्यात आले होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित राहून राहुल देशपांडे यांचा सत्कार केला व युवा सुराज्य प्रतिष्ठानाच्या वतीने दर वर्षी देण्यात येणाऱ्या युवारत्न पुरस्काराने राहुल देशपांडे यांना गौरविण्यात आले.यावेळी कोथरूड भागातील अनेक नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून या संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालावधी नंतर प्रथमच इतक्या मोठया संख्येत संगीत प्रेमी उपस्थित राहु शकले व इतका उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित झाला असे यावेळी राहुल देशपांडे यांनी नमूद करून पुनीत जोशी यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील,शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ,पुणे शहर प्रभारी धीरज घाटे,संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस दीपक पोटे, प्रवक्ते संदीप खर्डेकर तसेच सर्व नगरसेवक,मंडलाचे सर्व पदाधिकारी, मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये