राष्ट्रीय

विषारी वायूमुळे ६ जणांचा मृत्यू : सुरतमधील प्रकार

सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये विषारी वायूमुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जवळच्या प्रिंटिंग मिलमधील कामगार आणि मजुरांचा समावेश आहे. तर २५ हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

सचिन औद्योगिक परिसरात आज पहाटे हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सध्या सर्व बाधितांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

केमिकलने भरलेला टँकर मिलच्या बाहेर उभा होता. त्याचा पाइप ड्रेनेज लाइनमध्ये टाकण्यात आला होता. त्यातून निघणाऱ्या रसायनाच्या अभिक्रियेमुळे विषारी वायू तयार होऊन आजूबाजूला पसरला, असा असा दावा प्रिंटिंग मिलच्या प्रोडक्शन मॅनेजरने केला आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789
Img 20220105 wa00031311456043270984558

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये