पुणे शहर

शिवणे मधील इमारतीच्या पार्किंगमध्ये आग; १३ दुचाकी व २ रिक्षा जळून खाक

पुणे : आज (गुरुवारी) पहाटे पाच वाजता अचानक लागलेल्या आगीमुळे शिवणे, शिंदे पुलाजवळ, शिवकमल प्रेस्टीज इमारतीच्या पार्किगमधील 13 दुचाकी व 2 रिक्षा जळून खाक झाल्या आहेत. पुणे महापालिका व आणि पीएमआरडीए च्या अग्निशमन दलाने आग विझवली असून जखमी कोणी नाही.


आज पहाटे पाच वाजता शिवणे येथील शिंदेपुलाजवळील शिवकमल प्रेस्टिज या इमारतीच्या पार्किंग मध्ये आग लागली. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला संपर्क साधल्या नंतर पुणे महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबतीत स्थानिक पोलीस प्रशासन तपास करीत आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789
Whatsapp image 2022 01 05 at 1. 18. 18 pm
Img 20220108 wa0171

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये