पुणे शहर
अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे अपघात ग्रस्त टेम्पो चालकाची सुटका; कर्वे रस्त्यावरील घटना

पुणे : कर्वे रस्त्यावरील सोनल हॉलजवळ झालेल्या अपघातामध्ये एका टेम्पो चालकाचे दोन्ही पाय अडकले होते. अग्निशमन दलाने कटर व रश्शीचा वापर करत जखमी चालकाची दहा मिनिटात सुटका केली. बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे.
या कामगिरीत एरंडवणा अग्निशमन केंद्र अधिकारी राजेश जगताप, चालक शेखर येरफुले, तांडेल राजेश पायगुडे, जवान कैलास पवार, विठ्ठल सावंत, महेश देशमुख, संतोष कार्ले, आशुतोष पिंगळे, हेमंत कांबळे, ऋषिकेश गित्ते यांनी सहभाग घेतला.










