पुणे शहर
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुण्यात बैठक

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीतील प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आज (गुरुवार, दि.१०रोजी) सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे बोलाविण्यात आलेली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तयारीची दिशा ठरविणे, बूथ कमिटी आणि सभासद नोंदणीचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे, असे पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कळविले आहे.
बैठकीसाठी कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी, पक्षाच्या विविध सेलच्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनी उपस्थित राहावे. असेही बैठकीसाठी काढण्यात आलेल्या सूचनेत म्हटले आहे.




