ज्योतिष

जाणून घ्या कोणत्या राशींचे बदलणार भाग्य

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा दुसऱ्या ग्रहासोबत येतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. आज ग्रहांचा राजा सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्याच वेळी ज्ञानाचा कारक गुरु आधीच कुंभ राशीत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दोन ग्रहांमध्ये मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हा योगायोग सकारात्मक ठरणार आहे. या दोन ग्रहांच्या मिलनाचा सर्व राशींवरही परिणाम होईल. पण अशा चार राशी आहेत, ज्याचा राशी संबंधित लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया या चार राशी कोणत्या :

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

मेष : गुरु आणि सूर्याचा संयोग तुमच्यासाठी शुभ राहील. या दरम्यान तुमचे उत्पन्न वाढेल. अनेक स्त्रोतांकडून पैसे मिळतील. खर्चावर नियंत्रण राहील. व्यवसायात चांगला फायदा होईल.

वृषभ : व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. तुम्हाला या काळात वेतनवाढ मिळू शकते. तुमच्या राशीत सूर्य आणि गुरु यांचा संयोग दहाव्या घरात म्हणजेच कर्म स्थानात होत आहे.

कर्क : आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवाल. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. जोडीदाराची बाजू समजून त्याच्याशी संवाद साधावा.

सिंह : अस्वस्थता जाणवेल. कोणाशी वादविवाद होऊ नये याची काळजी घ्या. अंगीभूत कलागुणांना वाव द्या. त्यामुळे तुमचे कौतुक होईल.

कन्या : कोरोना काळात तुम्ही आरोग्याची खूप काळजी घेतली. योग-ध्यानधारणा, व्यायाम याचा लाभ होऊन आरोग्य सुधारेल. व्यावसायिक लाभ होतील.

मिथुन : तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात तुम्हाला फायदा होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. तुम्ही नवीन करार करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. तुमच्या राशीतील नवव्या म्हणजेच भाग्य स्थानात सूर्य आणि गुरूचा संयोग होत आहे, ज्यामुळे तुम्हाला या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. 

तूळ : प्रतिकूल काळ. भांडणांपासून दूर राहा. प्रलोभनापासून दूर राहा. भागिदारीतून चांगली कमाई करता येईल.

वृश्चिक : घशाचे विकार जाणवतील. विनाकारण खरेदी टाळा. काही कामात अधिक श्रम घ्यावे लागतील. कामात उतावीळपणा करून चालणार नाही. गोड बोलण्यावर भर द्यावा.

धनू : स्वभावात हेकटपणा राहील. स्वातंत्रप्रियता दर्शवाल. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. हातात नवीन अधिकार येतील. 

मकर : व्यवसायात चांगले पैसे कमवू शकता. दुसरीकडे, तुम्ही या वेळी नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अनुकूल आहे. तुमच्या राशीतील धन स्थानात गुरु आणि सूर्याचा संयोग होत आहे. 

कुंभ : स्थावरच्या कामात यश. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य. कामात समाधानी राहाल. जवळचे नातेवाईक भेटतील. परिस्थितीशी जुळवून घ्या.

मीन : सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. सट्टा, जुगार नादी लागू नका. छंद जोपासायला वेळ काढा. बाकी काळजी घेतल्यास उत्तम दिवस राहील.

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये