बाप बेटे जेल मधे जाणार; संजय राऊतांचं ट्विट

पुणे : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक नवं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की,
बाप बेटे जेल मधे जाणार !
Wait and watch !
कोठडीचे sanitization सुरू आहे…
जय महाराष्ट्र !

त्यामुळे आता किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर काही कारवाई होणार का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. किरीट सोमय्या यांचे PMC BANK घोटाळ्यातील आरोपीशी संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
या सगळ्याची कागदपत्रे आपण इकोनॉमिक ऑफेन्स विंग म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेकडून किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाविरुद्ध तपासाची चक्रे फिरायला सुरुवात होणार का, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या शिवसेना नेत्यांवर, संजय राऊत यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर सातत्याने आरोप करत होते. मात्र, संजय राऊत यांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे इतके दिवस इतरांवर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनाच राऊतांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.



