पुणे शहर
प्राणी मित्रांच्या मदतीसाठी अगरवाल आर सी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कर्वेनगर मधील AART ग्रुपला प्राण्यांची रुग्णवाहिका भेट

पुणे : जखमी प्राण्यांची सेवा आणि लसीकरणासाठी प्राणी मित्रांना मदत व्हावी या उद्देशाने अगरवाल आर सी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जखमी प्राण्यांसाठी कर्वेनगर मधील AART ग्रुपला प्राण्यांची रुग्णवाहिका भेट देण्यात आली.
यावेळी तांबे कुटूंब, माजी नगरसेवक जयंत भावे, Pets Force Pune चे विनोद , आणि प्राणीप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.
आता प्राणीमित्र अधिक जोमाने शहरामधील जखमी प्राण्यांची सेवा, sterlization किंवा लासिकरण अधिक जोमाने करू शकणार आहेत. ह्या प्रसंगी AART ग्रुप ने अधिक प्राणी प्रेमींनी पुढे येऊन मुक्या प्राण्यांची सेवा करावी असे आवाहन केले.













